india

IPL वर पुन्हा कोरोनाचे संकट, दिल्लीचा खेळाडू पॉझिटिव्ह आल्यानं टीमचा मोठा निर्णय

मुंबई, 18 एप्रिल : गेल्या दोन वर्षांनंतर यंदाच्या आयपीएल स्पर्धेवरही (IPL 2022) कोरोनाचं संकट वाढलं आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) फिजियो पॅट्रिक फारहार्ट (Patrick Farhart) यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर टीममधील आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त ‘क्रिकबझ’नं  दिलं आहे.

दिल्लीचा हा खेळाडू रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यानंतर त्याची RT-PCR टेस्ट होणार आहे. या सर्व घडामोंडीमुळे दिल्ली कॅपिटल्सनं आज (सोमवार) पुण्याचा प्रवास टाळला आहे. दिल्लीची बुधवारी पंजाब किंग्ज विरूद्ध सामना होणार आहे. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार दिल्लीची टीम आज पुण्याला रवाना होणार होती. पण, आता टीममधील सर्व सदस्य दोन दिवस क्वारंटाईन राहणार असून त्यामुळे बुधवारची मॅच संकटात आली आहे.

आयपीएल स्पर्धेत गेली दोन वर्ष कोरोनामुळे विघ्न येत आहेत. 2020 साली आयपीएलचा सिझन कोरोना व्हायरसमुळे नियोजित वेळापत्रकानुसार झाला नाही. त्यानंतर तो सिझन ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात यूएईमध्ये घेण्यात आला. मागील वर्षी आयपीएल स्पर्धा भारतामध्ये सुरू झाली. पण, त्यामधील बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानं ही स्पर्धा अर्धवट स्थगित करावी लागली होती. उर्वरित आयपीएल ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये पार पडले.

IPL दरम्यान चेतेश्वर पुजारा फॉर्मात, डबल सेंच्युरी करत टाळला टीमचा पराभव

दिल्ली कॅपिटल्सचे 5 मॅचनंतर 2 विजय आणि 3 पराभवासह 4 पॉईंट्स आहेत. सध्या ही टीम पॉईंट टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरूद्ध दिल्लीचा पराभव झाला होता. या मॅचमधील टीमच्या खराब कामगिरीवर कोच रिकी पॉन्टिंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीसाठी आगामी 2 मॅच महत्त्वाच्या आहेत, असं सांगत त्यांनी प्लेईंग 11 मध्ये बदलाचे संकेत दिले होते. पण, त्यापूर्वीच टीममधील खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यानं त्यांच्या तयारीला धक्का बसला आहे.

Related Articles

Back to top button