देश

युद्धनौका INS विक्रांतच्या पैशाला फुटले पाय… पोलिसांच्या चौकशीत समोर येईल आणखी काय काय… राऊत यांचा इशारा

आर्थिक गुन्हे विभागाकडून भाजप नेते किरीट सोमैय्या यांची चौकशी करण्यात येत आहे. यावर हे कायद्याचे राज्य आहे आणि कायद्यानुसारच चालेल, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिलीय.

किरीट सोमय्या यांची आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी सुरु आहे. चार दिवस ही चौकशी सुरु रहाणार आहे. सोमय्या यांची चौकशी सुरु असताना त्यांचे वकील विवेकानंद गुप्ता हे ही त्यांच्यासोबत होते.

सोमय्या यांच्या सुरु असलेल्या चौकशीबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, हायकोर्टाने तसे आदेश दिले आहेत की विक्रांत घोटाळ्यातील आरोपीने आर्थिक गुन्हे शाखा किंवा पोलिसांसमोर चौकशीसाठी उभे रहा. त्यासाठी ते गेले असतील. हा पोलीस तपासाचा भाग आहे. ईडी ( Ed ) किंवा इन्कम टॅक्सपेक्षाही आमचे अधिकारी हे अशा प्रकारच्या तपासासाठी अधिक सक्षम आहेत असे ते म्हणाले.

 

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी भाजपने आजपासून पोल खोल अभियान सुरु केलंय. मात्र, जे स्वतःच उघडे नागडे झालेले आहेत त्यांच्याकडून पोल-खोलची काय अपेक्षा करत आहात, असा सवाल त्यांनी केला.

भारतीय जनता पक्षाच्या म्हणण्याने महाराष्ट्र झालेला नाही. या राज्यात कायद्याचे राज्य आहे आणि कायद्यानुसारच चालेल. अयोध्येचा मुद्दा हा पॉलिटिकल मुद्दा नाही. शिवसेना नेहमीच अयोध्येत जात आली आहे. कोणीही कुठेही सभा घेऊ द्या. या देशात लोकशाही आहे. सभा घ्यायला बंदी नाही. त्यामुळे कोणाला कुठे सभा घ्यायची आहे ते घेऊ दे, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

सोमय्या हे पोलिसांसमोर हजर रहावे त्यासाठी गेले असतील. हा पोलीस तपासाचा भाग आहे. INS विक्रांत युद्धनौकेच्या नावाखाली पैसे गोळा करण्यात आला.  मात्र हा पैसा राजभवनात पोहोचला नाही. त्या पैशाला कुठे पाय फुटले का? कुठे गायब झाले, किती कोटी पैसे गोळा झाले, ते कोणाच्या खात्यात गेले या संदर्भात पोलिस अधिक तपास करतील. याबाबत मी बोलणं योग्य होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button