Search
Close this search box.

मार्क झुकरबर्गच्या सुरक्षेची किंमत तब्बल ३ कोटी डॉलर्स!, आतापर्यंतच्या खर्चाची ही यादी पाहा…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

फेसबुकचा (आता मेटा) संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि त्याचे कुटुंबीय यांच्या सुरक्षेवर त्याची कंपनी किती खर्च करत असेल असा तुमचा अंदाज आहे? – दर  वर्षाला तब्बल २ कोटी ६८ लाख डॉलर्स. यात मार्क आणि त्याच्या कुटुंबीयांची दैनंदिन सुरक्षा, शिवाय  विदेशात प्रवास करताना सुरक्षेसाठी करावी लागणारी विशेष तरतूद, यासंबंधीचा इतर खर्च आणि झुकरबर्गच्या प्रायव्हेट जेटचा खर्च समाविष्ट आहे. झुकरबर्ग कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी २०१३ साली एक स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात आली. तेव्हापासून आजवर १२७ दशलक्ष डॉलर्स या व्यवस्थेवर कंपनीने खर्च केले आहेत. अर्थात, मार्क झुकरबर्ग हे जगातली सर्वात महाग सुरक्षा व्यवस्था असलेले व्यावसायिक ठरले आहेत. अमेझॉनचे जेफ बेझोस यांच्या सुरक्षेवर वर्षाला जेमतेम दीड दशलक्ष डॉलर्स खर्च होतात. गूगलचे सुंदर पिचई यांच्या सुरक्षेवर कंपनी सव्वाचार दशलक्ष डॉलर्स खर्च करते. त्यामानाने ॲपलचे टीम कुक यांच्या सुरक्षेसाठी सर्वात कमी; ६ लाख ३० हजार डॉलर्स खर्च येतो.

admin
Author: admin

और पढ़ें