देश

अरे काय चाललंय पुण्यात, कोयता गळ्याला लावून सोने व्यापाऱ्याला लुटलं

पुणे शहरांमध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. एक धक्कादायक घटना ‘झी 24 तास’च्या हाती लागली आहे. चोरट्यांना पुणे पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे पुढे आला आहे.  हातात कोयते घेऊन रस्त्यावर नागरिकांमध्ये दहशत पसरवणारे पुण्यात सक्रिय झालेत. आता तर गळ्याला कोयता लावून सराफा व्यापाऱ्याला लुटले. (Jewellery trader robbed in Pune)

लोहगावात ही घटना घडली आहे. सराफ व्यवसायिकाच्या गळ्याला कोयता लावून लुटण्यात आले. व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून 73 हजारांचे दागिने चोरट्यांनी लांबवले. व्यवसायिकांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

आझाद चौकात महाले ज्वेलर्स सराफमध्ये दोन चोरटे दुकानात शिरले. त्यांनी दागिने खरेदी करण्याचा बहाणा केला. एकाने सराफ व्यवसायिकाला कोयत्याचा धाक दाखवला तर दुसऱ्या चोरट्यांनी पकडून ठेवले. जीवे मारण्याची धमकी देऊन 73 हजाराचे दागिने घेतले. यामध्ये दोन सोनसाखळ्या लांबल्या. याबाबत पोलीस तपास करत आहेत. पुणे शहरामध्ये कोयता गॅंग पाहायला मिळत आहेत. मात्र पोलिसांचा वचक राहिलेले दिसत नाही, अशी नागरिकांची प्रतिक्रिया आहे.

Related Articles

Back to top button