Search
Close this search box.

IB अधिकारी थेट आमदाराच्या घरात, निघाली त्याची अशी वरात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिवसेना आमदार विल्पव बाजोरिया आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या बंगल्यासमोर एक गाडी आली. त्यातून एक तरुण उतरला.  आमदारांच्या बंगल्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांना त्याने आपण IB ( Intelligence Bureau ) अधिकारी असल्याचं सांगितलं. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्याला आत पाठवलं.

आमदारांच्या बंगल्यात घुसल्यानंतर तो अधिकारी समोरच्या सोफ्यावर बसला. त्याने ‘मी आयबीचा माणूस आहे. तुमच्याकडे असलेल्या सर्व वाहनांची आणि घरांची घराचे कागदपत्र दाखवा, असं म्हणत आमदारांच्या नातवासोबत वाद घातला.

पण, आमदारसाहेबांच्या कुटुंबीयांना काहीतरी वेगळी चाहूल लागली. त्यांनी त्याला बरोबर ओळखला. मग, आमदारकीचा त्याला खरा इंगा दाखविला. त्याला बंगल्याबाहेर काढून आमदारांच्या कुटुंबीयांनी त्याला खदान पोलिसांच्या हवाली केले.

अकोला स्थानिक स्वराज संस्थामधून विधान परिषदेवर निवडून येणारे शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि त्यांचा मुलगा आमदार विल्पव बाजोरिया यांच्या बंगल्यात ही घटना घडली. IB अधिकारी असल्याचं सांगून आमदारांच्या घरात घुसणाऱ्या त्या  तोतया अधिकाऱ्याविरोधात खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रतिक संजयकुमार गावंडे (वय ३२, राहणार लेडी हार्डिग काँर्टर्स, अकोला) असे त्या तोतया अधिकाऱ्याचं नाव आहे.

admin
Author: admin

और पढ़ें