अपराध समाचारदेश

धक्कादायक! नागपूरमध्ये कचऱ्यात सापडली पाच ते सहा अर्भकं

नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या क्वेटा कॉलनीत पाच ते सहा मृत अर्भकं सापडली आहेत. या प्रकराने परिसरात खळबळ उडाली आहे.

नागपूरच्या क्वेटा कॉलोनी परिसरात मोकळ्या मैदानाच्या बाजूला असलेल्या कम्पाऊंड वॉलनजीक कचऱ्यात ही मृत अर्भकं सापडली आहेत

पोलीस आणि फॉरेन्सिक टीम पोहचली घटनास्थळी दाखल झाले असून पुढचा तपास सुरु आहे. गर्दीची वस्ती असल्याने या ठिकाणी अर्भक कोणी आणली टाकली याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

 

स्थानिक नगरसेवक मनोज यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. परिसरात काही हॉस्पीटल आहेत, पण हे परिसरातील बाहेरच्या हॉस्पीटलमधून कोणीतरी इथे आणून टाकल्याचा संशय नगरसेवकांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Back to top button