देश

शेतकऱ्यांवर पुन्हा अवकळीचे संकट; येत्या 4 दिवसांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता

राज्याला बेसमोसमी पावसाचा गेल्या काही वर्षापासून फटका बसत आहे. सध्या राज्यातील अनेक परिसरात उन्हाचे चटक बसत असताना, आता अचानक हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.

ऐन उन्हाळ्याच्या सुरूवातीला राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या दोन ते चार दिवसात मराठवाड्यात अवकाळी पाऊस तर इतर ठिकाणी ढगाळ हवामान असण्याचा अंदाज आहे.

राज्यात अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाची शक्यता आहे. परंतू पावसाचा पिकाला फटका बसू शकतो. काढणीला आलेल्या गहू, हरबरा, ज्वारी सारख्या पिकांना अवकाळीचा जबर फटका बसू शकतो.

 

त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी काढणी पूर्ण केली असल्यास त्यांनी आपली पिके झाकून ठेवावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

Related Articles

Back to top button