Search
Close this search box.

शिवरायांची जयंती साजरी करण्यासाठी राज्य सरकारचे नियम जारी; सोहळ्याला इतक्याच जणांना परवानगी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली.

राज्यभरात तारखेनुसार येणारा शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. या सोहळ्यासाठी मोठ्या मिरवणूका काढल्या जातात. शिवरायांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. परंतू कोरोना संसर्ग अद्याप पूर्णतः संपलेला नाही.

आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आऱोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळा साजरा करावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. येत्या शनिवारी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे.

admin
Author: admin

और पढ़ें