Search
Close this search box.

55 हजारांची खंडणी : भाजप नगरसेवकासह चौघांना अटक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

BJP Corporator Arrested : 55 हजारांची खंडणी (Ransom) घेतल्याच्या आरोपाखाली भाजप नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह अन्य चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. घोळवे याच्यावर व्यापाऱ्यांना गाळे मिळवून देण्यासाठी खंडणी घेतल्याचा आरोप आहे. (BJP Corporator Keshav Gholve Arrested In Pimpri)

पिंपरीतील कापम मार्केटमधील दुकानदारांकडन खंडणी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. घोळवे हा माजी उपमहापौर आहे. त्याला मध्यरात्री अटक करण्यात आल्याची माहिती आज सकाळी समजली.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या नावाने काहीजण पैसे गोळा करत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर काही व्यापाऱ्यांनी अधिक चौकशी केली. त्यावेळी राष्ट्रवादीचा नगरसेवक मागणी करत नसल्याचे समजले. त्यांनी तात्काळ पोलीस तक्रार केली. याचा तपास पोलिसांनी सुरु केल्यानंतर मोठी माहिती समोर आली.

पोलिसांनी खंडणी प्रकरणी भाजप नगरसेवक केशव घोळवे, गुड्डू यादव यांच्यासह अन्य तिघांना अटक केली आहे. खंडणीचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

admin
Author: admin

और पढ़ें