Coronavirus in Britain: ‘ओमिक्रॉन’समोर फोल ठरली ‘कोव्हिशिल्ड’; भारताचंही टेन्शन वाढलं
Coronavirus in Britain : एका नव्या अभ्यासात 'अॅस्ट्रेजेनेका' करोना लस काही महिन्यांतच 'ओमिक्रॉन' व्हेरियंटविरुद्ध अप्रभावी ठरत असल्याचं दिसून आलंय. 'ऑक्सफर्ड -अॅस्ट्रेजेनेका'ची हीच लस भारतात 'कोव्हिशिल्ड' ओळखली जातेय.
लंडन, ब्रिटन :
ब्रिटनमध्ये लाखो लोक करोनाच्या ‘ओमिक्रॉन‘ व्हेरियंटच्या संक्रमणामुळे धास्तावले आहेत. करोना लशीचा बुस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांची धावपळ उडालीय. याच दरम्यान करोना लशीच्या एका अभ्यासानं देशावरचा ताण आणखीन वाढलाय. या अभ्यासात ‘अॅस्ट्रेजेनेका‘ करोना लस काही महिन्यांतच ‘ओमिक्रॉन’ व्हेरियंटविरुद्ध अप्रभावी ठरत असल्याचं दिसून आलंय.
भारतातही ‘अॅस्ट्रेजेनेका’च्या लशीचा वापर
उल्लेखनीय म्हणजे, ‘ऑक्सफर्ड -अॅस्ट्रेजेनेका’ची हीच लस भारतात ‘कोव्हिशिल्ड‘ ओळखली जातेय. या लशीचं उत्पादनही भारतातच केलं जातंय. तसंच या लसीचा भारतातही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतोय. त्यामुळे ब्रिटनसोबतच आता भारताचंही टेन्शन वाढलंय. परंतु, देशात लाखो असे नागरिक आहेत ज्यांनी करोनाचा बुस्टर डोस घेतलेला नाही.
दिलासादायक गोष्ट म्हणजे, करोना लशीचा तिसरा डोस अर्थातच ‘बुस्टर डोस’ ओमिक्रॉन व्हेरियंटविरुद्ध ७६ टक्के फायदेशीर ठरत असल्याचं समोर येतंय. त्यामुळे तज्ज्ञांकडून करोना लसीचा तिसरा डोस घेण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येतंय.
ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या (National Health Service – NHS) बुकिंग साईटवर काही तांत्रिक समस्या असल्यानं ख्रिसमसपर्यंत अनेक लांकांना करोना लस घेऊ शकणार नाहीत, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलीय.