देश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांची भेट नाहीच, पण का? वाचा

उद्धव ठाकरे घेणार नाहीत ममत बॅनर्जींची भेट, राजकीय चर्चांना उधाण 

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आल्या आहेत. ममता बॅनर्जी 3 दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. आज त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होत्या. मात्र ही भेट होऊ शकणार नाही.

ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांची भेट न होण्यामागचं कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करून याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

तब्येतीच्या कारणामुळे उद्धव ठाकरे ममता बॅनर्जींना भेटू शकणार नाहीत असं संजय राऊत यांनी ट्वीट करून स्पष्टीकरण दिलं आहे. संजय राऊत

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होत्या मात्र उद्धव ठाकरेंच्या तब्येतीमुळे ही भेट होणार नसल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून दिली आहे.

संजय राऊत आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ममता बॅनर्जी यांना भेटणार आहेत. ट्रायडंट हॉटेलमध्ये संध्याकाळी साडेसात वाजता ही भेट होणार आहे. 3 दिवसाच्या दौऱ्यात ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांचीही भेट होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

 

Related Articles

Back to top button