PM मोदींनी केली आशियातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी
PM मोदींनी केली आशियातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमधील ( pm modi lays out of noida international airport ) नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी केली. यूपीमधील हे एकूण नववे आणि पाचवे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. यूपी हे देशातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले राज्य आहे.
हे आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे ७२ किमी अंतरावर असेल. नोएडापासून त्याचे अंतर सुमारे ४० किमी असेल. दादरी येथील प्रस्तावित मल्टी-मॉडल लॉजिस्टिक हबपासून सुमारे हे विमानतळ इतक्याच अंतरावर असेल. या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याच वर्षी देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत.
विमानतळाच्या पहिल्या टप्प्यासाठी १०,०५० कोटीं रूपयांहून अधिक खर्च येणार आहे. हे विमानतळ १३०० हेक्टरहून अधिक क्षेत्रफळात पसरलेले असेल आणि सुमारे १.२ कोटी प्रवासी त्याचा उपयोग करू शकतील.
पण शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे हे विमानतळ वादात सापडले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी विमानतळासाठी संपादित करण्यात आल्या आहेत ते शेतकरी विमानतळाजवळ तंबू ठोकून आहेत. हे भूसंपादन घाईगडबडीत झाल्याची कबुली एका स्थानिक भाजप आमदाराने दिली आहे.
हे विमानतळ सार्वजनिक-खासगी भागीदारी किंवा पीपीपी अंतर्गत विकसित केले जात असून काम पूर्ण झाल्यानंतर ते देशातीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठे विमानतळ असेल.