देश
Big Breaking | सुधारित कृषी कायदे मागे घेत असल्याची पंतप्रधान मोदी यांची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कृषी कायद्यांविषयी मोठी घोषणा केली. गेल्या अनेक महिन्यांपासून सुधारित कृषी कायद्यांच्याविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी ९ वाजता देशाला संबोधित करताना तिन्ही कृषी सुधारणा कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. आज गुरू नानक जयंतीच्या दिवशी मोदी यांनी ही घोषणा केली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. तसेच आता आंदोलनकर्त्यांनी आंदोलन परत घ्यावे. असं आवाहनही नरेंद्र मोदी यांनी केले आहे.