देश

पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय

आरोग्य मंत्रालायाने पोस्टमार्टम (Post-Morterm) बाबत नवीन प्रोटोकॉल जाहीर केला आहे. हत्या, आत्महत्या, बलात्कार, छिन्न-विछिन्न शव यांचे पोस्टमार्टम आता सूर्यास्तानंतरही केले जाणार आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ट्विट करून माहिती दिली आहे.

इंग्रजांनी बनवलेले नियम मोडणार
आता इंग्रजांनी तयार केलेल्या नियमाला मोडीस आणलं आहे. 24 तासांत पोस्टमार्टम रिपोर्ट मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘गुड गव्हर्नन्स’ ची कल्पना पुढे नेत, आरोग्य मंत्रालयाने जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोस्टमार्टम रिपोर्टबाबत मोठी माहिती
आरोग्यमंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, ब्रिटिशकालीन व्यवस्था संपली! २४ तासांत शवविच्छेदन केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘गुड गव्हर्नन्स’ची कल्पनेला पुढे घेऊन आरोग्य मंत्रालयाने असा निर्णय घेतला आहे. ज्या रुग्णालयांमध्ये शवविच्छेदन आहे त्यांनी रात्री देखील पोस्टमार्टम करण्यास परवानगी आहे. त्यामुळे आता नागरिकांना रात्री देखील पोस्टमार्टमचा रिपोर्ट दिला जाणार आहे.

नवीन प्रोटोकॉलमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, अवयवदानासाठी पोस्टमॉर्टम प्राधान्याने केले जावे. तसेच, कोणत्याही शंका दूर करण्यासाठी आणि कायदेशीर हेतूसाठी, कायदेशीर कारणांसाठी रात्रीच्या वेळी सर्व पोस्टमॉर्टेमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाईल.

नवीन नियमानुसार खून, आत्महत्या, बलात्कार, छिन्नविछिन्न मृतदेह यासारख्या प्रकरणांमध्ये रात्री पोस्टमॉर्टम केले जाणार नाही. त्याची माहिती संबंधित मंत्रालये, विभाग आणि राज्य सरकारांना कळवण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button