‘मला अनेक धमक्या आल्या पण मी…’ गडचिरोलीतील चकमकीनंतर एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया
‘गडचिरोलीत झालेल्या चकमकीत 26 नक्षलींना कंठस्नान घालण्याच पोलिसांना यश आलं आहे, गेल्यावर्षभरातली देशातील सर्वात मोठी कारवाई….’ असल्याचं स्पष्टीकरण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये मोठा नक्षली कमांडर मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. एवढंच नाही तर एकनाथ शिंदे त्याठिकाणी जावून पोलीस आणि जवानांची भेट घेणार आहेत.
एकनाथ शिंदे म्हणाले, ‘पालकमंत्री म्हणून मी पोलीस आणि जवानांचं अभिनंदन केलं… या कारवाईत 4 जवान जखमी झाले आहेत त्यांच्याशी मी फोनवरून संपर्क साधला… शासनाकडून हवी ती मदत केली जाईल…’ असं अश्वासन देखील पालकमंत्र्यांनी दिलं आहे आहे.
ते पुढे म्हणाले, ‘सर्व पोलीस आणि जवान त्याठिकाणी जीव धोक्यात घालून काम करत असतात… जवळपास 9 ते 10 तास ही चकमक सुरु होती… या कारवाईची दखल सर्व राज्यांनीघेतली आहे. चकमकीत मिलिंद तेलतुंबडे नक्षलवाद्याला कंठस्थान घातले. छत्तीसगड, आंध्रप्रदेश नक्षलवाद्याच्या शोधात होते. तेलतुंबडे हा मोरक्या असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
‘मिलिंद तेलतुंबडेवर 50 लाखांहून अधिक रुपयांचं बक्षीस होते. याठिकाणी सामन्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होतं आता स्थिती पूर्ववत झाली आहे. मी जवान आणि पोलिसांची प्रत्यक्ष जाऊन भेट घेणार आहे… त्या भागाचा विकास आम्ही डोळ्यासमोर ठेवला असल्यांचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
त्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ‘या चकमकीत मला धमकी देणारा मारला गेला की नाही याचा सखोल तपास पोलीस आणि गृहविभाग करणार आहेत. अशा अनेकवेळा धमक्या आल्या आहेत पण त्या धमक्यांना मी घाबरलो नाही.’ असं एकनाथ शिंदे म्हणाले…