देश

तणावग्रस्त परिसरात कायदा सुव्यवस्था नियंत्रणात : दिलीप वळसे पाटील

राज्यात काही जिल्ह्यांध्ये त्रिपूरातील कथित घटनेनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याबाबत गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ‘अमरावती शहरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. पूर्ण शहरात परिस्थिती नियंत्रणात आहे. अमरावती ग्रामीणमध्ये भाजपकडून बंदची घोषणा करण्यात आली असून तेथे देखील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः नियंत्रणात आहे’.

तणावाची परिस्थिती असलेल्या जिह्यांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी योग्य ती कारवाई करीत आहेत. त्रिपूरातील कथित घटनेनंतर झालेल्या हिंसाचाराबाबत निश्चितच चौकशी करण्यात आली आहे. त्यात रझा ऍकेडमी असो किंवा अन्य कोणत्याही संघटनेवर योग्य चौकशी करून निर्णय घेण्यात येईल. असे गृहमंत्र्यांनी म्हटले

‘राज्यातील इतर ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात असून, अमरावतीतली परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

तर समाजात द्वेष पसरवणा-यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा गृहमंत्र्यांनी यावेळी दिला.

नांदेड, मालेगावातले वातावरण पूर्णपणे निवळले आहे. नांदेडमध्ये पोलिसांनी दंगलखोरांना अटक केली तर मालेगावात तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत. दहा हुल्लडबाजांना अटक केली आहे.

Related Articles

Back to top button