ST संपाबाबत विरोधकांना नाट्य पुरस्कार देऊ, संजय राऊत यांचा भाजपला टोला
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. सरकारने संप मागे घ्या, असे आवाहन करुनही कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. ST संपाबाबत विरोधी पक्षाला नाट्य पुरस्कार देऊ, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी लगावला. डोकी भडकावून भाजपला राजकीय लाभ घ्यायचाय आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. (Sanjay Raut criticized on BJP over ST strike)
शिवसेना सेठजी, बिल्डरचा पक्ष नाही. विरोधकांना लोकांची डोकी भडकवायची आहेत. एसटी कामगार संप जे चिघळवत आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. भाजप नेते एसटी आंदोलनात जात आहेत. जमलं तर त्यांना नाट्य पुरस्कार देऊ, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी मारला. डोकी भडकावून भाजपला लाभ घ्यायचा आहे. पण यातून कामगार मरतोय, अशी टीका त्यांनी केली. शिवसेना हा सेठजी, बिल्डरांना पक्ष नाही. हा कामगारांचा मोर्चा आहे. ज्यांना कामगारांच्या घामाचा वास यायचा ते त्यांचा संप चिघळवत आहेत अशी टीका त्यांनी केली.
एसटी कामगार संप जे चिघळवताय ते कोण आहे ते सगळ्यांना माहीत आहे. ज्यांना कामगारांच्या घामाचा वास यायचा, आता ते त्यांच्या संप चिघळवत आहेत. एसटी कामगारांचा प्रश्न फडणवीस मुख्यमंत्री असतानापासून सुरु आहे. विलिनीकनावर घोडं अडलं आहे. मात्र विरोधी पक्षाना आता लोकांची डोके भडकवायची आहे. त्यांना यातून लाभ घ्यायचा दिसतोय, असे राऊत म्हणाले.
‘तर Interval के बाद संजय राऊत की एन्ट्री होगी’
मुंबई ड्रग्ज प्रकरणी कारवाईबाबत नवाब मलिक यांनी NCBवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही कारवाई फर्जीवाडा आहे, असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या पाठीशी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहेत. नवाब मलिक न्यायाची लढाई लढत, हे प्रकरण संपावे ही आमची इच्छा मात्र भाजपला शहाणपण येत नसेल तर इंटरवल (Interval – मध्यांतर) के बाद संजय राऊत की एन्ट्री होगी, हे सगळ्यानी लक्षात ठेवावे, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
आम्ही त्यामुळे भाजपला सांगतोय. आम्हाला महिलांचा अपमान करायचा नाही, मात्र मर्दासारखे पुढे या, आम्ही कुणालाही घाबरत नाही. मलिक म्हणतात नकाब उघडणार आणि आम्ही म्हणतो नकाब कशाला कपडे उतरतील, लक्षात घ्या. नवाब सगळ्यांना भारी पडतील हे सत्य आहे आणि पुढेही पडतील, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची तब्बेत उत्तममुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत उत्तम आहे. दोन दिवसात ते घरी जातील आणि कामालाही लागतील, शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.
औरंगाबादेत महागाई विरोधात मोर्चा
आज औरंगाबादेत महागाई विरोधात मोर्चा आहे. महागाईने लोक पिचले आहेत. तो आक्रोश मांडण्यासाठी हा मोर्चा आहे. मोर्चाला मनसे आम्हाला विरोध करताय एक तर त्यांना महागाईची झळ बसत नसेल नाहीतर विरोध करायला अनुदान मिळत असेल, हा आजचा महागाई विरोधात मोर्चा आहे त्यांनी समजून घ्यावे, केंद्र सरकार आर्थिक कोंडी करते यासाठी मोर्चा आहे. फक्त केंद्रीय एजन्सी वापरून महागाई सुटणार नाही. केंद्राने काय कमी केले, सव्वाशे रुपये वाढवले आणि सव्वा रुपया कमी केले, हे आम्हाला शिकवू नाका, असे राऊत म्हणाले.