PM Modi जवानांसोबत साजरी करणार दिवाळी, लष्कराच्या तयारीचा घेणार आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षीप्रमाणे यंदाही सैनिकांसोबत दिवाळी साजरा करणार आहेत. पंतप्रधान मोदी हे नियंत्रण रेषेजवळ असलेल्या राजौरी भागातील नौशरामध्ये जवानांबरोबर दिवाळी साजरी करणार आहेत. यानिमित्तानं कोणते कार्यक्रम होणार आहे हे स्पष्ट झालं नसलं तरी अर्धा दिवस मोदी जवानांबरोबर घालवणार आहेत. या भागात अतिशय तणावाचे वातावरण असतांना पंतप्रधान मोदी यांचा राजौरी भागातील दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. वर्षातील एक महत्त्वाचा सण साजरा करत देशाचे नेतृत्व हे सोबत असल्याचं सांगत जवानांचे मनौधर्य वाढवण्याचा प्रयत्न मोदी करणार आहेत.
राजौरी-पुंछ सीमा भागात दहशतवाद्यांविरोधात तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे सुरक्षा यंत्रणांना तैनात करण्यात आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता नौशेरा येथे पोहोचणार आहेत. प्रथम ते जम्मू विमानतळावर येतील, तेथून ते नौशेराकडे रवाना होतील.
पंतप्रधान मोदी राजौरीमध्ये तीन ते चार तास राहू शकतात. यादरम्यान ते सैनिकांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत लष्करी तयारीचा आढावाही घेणार आहेत.