अजित पवारांशी संबंधित कुठल्याही संपत्तीवर टाच किंवा नोटीस नाही, वकिलांचा खुलासा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही. तसेच अजित पवारांशी संबंधित कुठल्याही संपत्तीवर टाच किंवा नोटीस नाही, अजित पवारांच्या वकिलाने खुलासा केला आहे. तसेच त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. आयकर विभागाच्या पत्राला कायदेशीर उत्तर देणार असल्याचं अजित पवारांच्या वकिलांनी सांगितलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुस-या मंत्र्याला आयकर विभागाने मोठा झटका दिला होता. मंगळवार उपमुख्यमंत्री अजित पवारांना आयकर विभागाने नोटीस पाठवली. अजित पवारांच्या नातेवाईकांशी संबंधित कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्यात आली. कारवाई केलेली संपत्ती ही बेकायदेशीर नाही हे 90 दिवसांत सिद्ध करा असं आयकरकडून सांगण्यात आलं होतं. तोपर्यंत ही संपत्तीची विक्रीही करू शकत नाही असा आदेश आयकरकडून देण्यात आला आहे.
कुठल्या मालमत्तांवर कारवाई झालीय
नवी दिल्लीतील 20 कोटींचा फ्लॅट
निर्मल हाऊस पार्थ पवार ऑफिसची किंमत 25 कोटी
जरंडेश्वर शुगर फॅक्टरी जवळपास 600 कोटी
गोव्यातील रिसॉर्ट जवळपास 250 कोटी
महाराष्ट्रातील 27 वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी जवळपास 500 कोटी
या सगळ्या मालमत्ता आयकरने अटॅच केल्या आहेत. असं असताना आता अजित पवारांच्या वकिलांनी मोठा खुलासा केला आहे.