Breaking | राज्यात १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती; टास्कफोर्सचा विरोध
राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत टास्क फोर्सच्या सदस्यांनी लगेच शाळा सुरू करण्याला विरोध दर्शवला होता.
शालेय शिक्षण विभागाने 17 ऑगस्टपासून शाळा करण्याचा निर्णय घेतला असला तरी मंत्रिमंडळ बैठकीत मात्र टास्क फोर्सशी सल्लामसलत करून शाळेबाबतचा निर्णय घेण्याचे ठरले होते. त्यानुसार काल टास्क फोर्ससोबत प्रशासनाची बैठक पार पडली. यामध्ये टास्कफोर्सच्या सदस्यांनी शाळा सुरू करण्याची घाई करू नये. असा सल्ला देत. शाळा सुरू करण्याला विरोध दर्शवला. त्यामुळे सरकारने 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
राज्यातील शाळा १७ ऑगस्टपासून सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती
– काल रात्री मुख्य सचिव, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि टास्क फोर्सची याबाबत बैठक पार पडली
– या बैठकीत शाळा सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकाला स्थगिती देण्याचा निर्णय