देश

नागरिकांना मिळणार दिलासा; सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

करोनाच्या सक्रिय रुग्णांचा दर एक किंवा त्याहून कमी असणाऱ्या जिल्ह्यांमधील करोना प्रतिबंधत निर्बंध कमी करण्यात येतील आणि तसा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे. या प्रस्तावानुसार नजिकच्या काळात राज्यातील १४ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल होणार असून तेथील व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Strict restrictions on corona prevention are likely to be relaxed in 14 districts of the state)

सक्रिय रुग्णांचा दर एक किंवा त्याहून कमी असलेल्या जिल्ह्यांची यादी आरोग्य विभागाने तयार केली असून या यादीत एकूण १४ जिल्ह्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्बंधात शिथिलता करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर या चौदा जिल्ह्यातील व्यापार, उद्योग आणि दैनंदिन आर्थिक व्यवहाराला मोठी गती मिळणार आहे.

Related Articles

Back to top button