सांगली, कोल्हापूर पुराचा वाहतुकीला फटका, महामार्गासह 9 मार्ग बंद
राज्यात पावसाचा हाहाकार दिसून येत आहे. (Heavy rains in Maharashtra ) सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. पंचगंगा (Kolhapur floods ) आणि कृष्णा नदीच्या ( Sangli floods) पाण्याची पातळीत वाढ झाल्याने पुराचा धोका वाढला आहे. आलेल्या पुरामुळे सांगली – कोल्हापूर बायपास महामार्गासह 9 मार्ग बंद आहेत. त्यामुळे प्रवास कोणीही करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. (Sangli, Kolhapur floods hit traffic, 9 routes including highways closed)
शिरोळ तालुक्यात कृष्णा, वारणा, पंचगंगा आणि दुधगंगा या नद्यांच्या पाणीपातळी मोठी वाढ झाली आहे. उदगाव येथील सांगली-कोल्हापूर बायपास महामार्ग पहाटे चार वाजता पाण्याखाली गेला आहे. याबरोबरच तालुक्यातील इतर सांगली-कोल्हापूर बायपास मार्गासह जिल्हा आणि राज्य आठ मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. (floods in Maharashtra )
सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्यात मोठी वाढ झाला आहे. उदगाव येथील मोठ्या ओढ्यावर असलेल्या सांगली कोल्हापूर बायपास महामार्ग बंद झाला आहे. त्यामुळे उदगांव-जयसिंगपूर रेल्वे स्टेशनरस्ता बंद करण्यात आला आहे. वारणा नदीच्या वाढत्या पाण्यामुळे दानोळी-कोथळी, दानोळी- कवठेसार मार्ग बंद झाला असून कवठेसार गावाचा संपर्क तुटला आहे.
कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाण्यामुळे नांदणी-शिरढोण, नांदणी-धरणगुत्ती आणि नांदणी-कुरुंदवाड मार्ग बंद झाला आहे. तर हेरवाड-अब्दुललाट, शिरढोण-कुरुंदवाड हे मार्ग पाण्याखाली गेले आहेत.
कृष्णा नदीचे पाणी 41 फूट तर पंचगंगा नदीचे पाणी 55 फूट इतके वाढले आहे. तसेच पुढील 24 तास जोरदार पाऊस पडण्याचा शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुराच्या पाण्याचा धोका कायम आहे. एनडीआरएच्या पथकाची मदत घेण्यात आली आहे. मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.
या मार्गांवरील वाहतूक बंद
– कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर पाणी; वाहतूक पूर्णत: बंद
– कसबा बावडा-शिये रस्ता बंद
– मलकापूर ते रत्नागिरी मार्गावर येल्लूरजवळ पाणी
– बर्कीजवळ पुलावर पाणी; संपर्क तुटला
– मालेवाडी-सोंडोली येथील पूल वाहतुकीस बंद
– उखळू, खेडे, सोंडोलीकडे जाणार्या रस्त्यावर पाणी
– कडवी पुलावर पाणी; मलकापूर ते शिरगाव मार्ग बंद
– करंजफेण, माळापुढे, पेंढाखळे वाहतूक थांबवली
– करुंगळे ते निळे व कडवे ते निळे मार्ग बंद
– निलजी, ऐनापूर बंधार्यावर पाणी; वाहतूक बंद
– मालेवाडी ते सोंडोली रस्त्यावर पाणी
– गगनबावडा मार्गावर किरवे येथे पाणी; वाहतूक बंद
– कसबा बीड-महेदरम्यानचा पूल पाण्याखाली
– गारगोटी-गडहिंग्लज रस्ता वाहतुकीसाठी बंद
– मुरगूड ते कुरणी हा बंधरा पाण्याखाली असून निढोरीमार्गे कागल या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे.
– सुरुपली ते मळगे बंधारा पाण्याखाली तर सोनगे ते बानगे मार्गावरून वाहतूक सुरू आहे.
– बस्तवडे ते आणूर बंधार्यावर पाणी तर पर्यायी सोनगे, बानगेमार्गे वाहतूक सुरू आहे.
– कोवाडे, नांगनूर, निलजी, ऐनापूर या बंधार्यांवर पाणी आहे. तर महे ते बीड मार्गावर पाणी असल्याने वाहतूक बंद