देश

औरंगाबाद शहरात लसींचा प्रचंड तुटवडा.

औरंगाबाद शहरात कोरोना रुग्ण कमी आहे ही समाधानाची बाब असली तरी एक चिंता वाढवणारी बातमीनं प्रशासनं पुरतं वैतागलं आहे, गेली महिनाभर औरंगाबादेत लसींचा प्रचंड तुडवडा आहे, गरजेपेक्षा खूप कमी लस येताय, आणि त्या अवघ्या काही तासांतच संपत असल्यानं नागरिकही मेटकूटीला आले आहेत. गेली 4 दिवस तर औरंगाबादेत लसीकरण पुर्णपणे बंद आहे. महापालिकेनं राज्यशासनाला लसींबाबत माहिती दिली मागणीही नोंदवली मात्र शासनाकडून सुद्धा प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे.. य़ामुळ महापालिकेचे शहरातील 100 पेक्षा जास्त लसीकरण केंद्र बंद आहेत.. नागरिक चौकशी करून जाताय, मात्र समाधानकारक उत्तर कुणाचजवळ नाही.. नागरिकांच्या आणि महापालिकेच्या प्रयत्नांनी रुग्णंसख्येवर नियंत्रण मिळवलं, मात्र लसींचा असाच तुटवडा राहिला तर खरंच येणा-या तिस-या लाटेपासून औरंगाबादकरांचा बचाव होवू शकेल का हा सध्या भेडसावणारा प्रश्न आहे..

महापालिकेनं आतापर्यंत 3,84,959 लाख लोकांना पहिला डोस दिला आहे, तर 1,42,33 लाख लोकांना दुसरा डोस मिळाला आहे, तर सध्या 76 हजार नागरिकांचा दुसरा डोस देय आहे, मात्र लसींचा तुटवड्यामुळं त्यांना प्रतिक्षा करण्याशिवाय पर्याय नाहीये…

औरंगाबाद शहरात सध्या दिवसाला 10 ते 15 रुग्ण सापडत आहे.. ही जरी सुदैवाची बाब असली तरी लसींचा तुटवडा निश्चितपणे औरंगाबादसाठी त्रासदायक ठरू शकतो.. महत्वाचं म्हणजे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे औरंगाबादचे शेजारी आहे, त्यांनी औरंगाबादला कधीही लस कमी पडू देणार नाही याची वारंवार हमी दिली होती, मात्र औरंगाबाद सुरुवातीपासूनच लसीच्या तुटवड्याचा सामना करतेय.. त्यात महापालिका प्रशासन या तुटवड्यामुळं आता पुरतं हैरान झालं आहे..

तर दुसरीकडे औरंगाबादेत खाजगी हॉस्पिटलमध्ये लसींचा पुरेसा साठा आहे, माहितीनुसार सध्या शहरातील खाजगी हॉस्पिटलकडे 38 हजार लसींचा साठा आहे.. आणि महापालिकेच्या मोफत केंद्रावर लस नाही, यातून आता फक्त पैसै देवूनच लसीकरण होणार का हा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झालाय..

Related Articles

Back to top button