देश
BREAKING : रायगड-माथेरान घाट रस्त्यावर मोठी दरड कोसळली
रायगड-माथेरान घाट रस्त्यावर मोठी दरड कोसळली. नेरळ माथेरान रस्त्यावरील तिसऱ्या वळणावरील ही घटना आहे. दरड कोसळल्याने माथेरानकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मोठमोठे दगड आणि माती रस्त्यावर आल्याने रस्ता पूर्णपण बंद झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंना जखमी झालेलं नाही.
कल्याणमध्ये वालधुनी नदी धोक्याच्या पातळीवर
कल्याणमधल्या वालधुनी नदीने धोक्याची पातळी ओळडली आहे. वालधुनी नदी लगत असलेल्या शिवाजी नगर, अशोक नगर इथल्या भागात घरांमध्ये पाणी शिरलं आहे. इथल्या नागरिकांचं शाळेत स्थलांतर करण्यात सुरुवात करण्यात आली आहे.