Search
Close this search box.

धक्कादायक… भांडुपमध्ये भिंत कोसळली; 16 वर्षीय मुलाचा मृत्यू

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भांडुप अमरकोट शाळा परिसरामध्ये भिंत कोसळून एका 16 वर्षीय सोहम थोरातचा मृत्यू झाला आहे. घराबाहेर साचलेल्या पाण्याचा उपसा करत असताना भिंत कोसळली. या दुर्घटनेत सोहमचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळपासून मुंबईत घडलेली ही तिसरी घटना आहे. विक्रोळी सुर्यनगर परिसरामध्ये तीन ते चार घरांवर दरड कोसळली आहे .आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

तर, त्याचप्रमाणे, रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील चेंबूर भागात मोठी दुर्घटना घडलीये. पावसामुळे चेंबूरच्या भारत नगर भागातील झोपडपट्टीत भिंत कोसळली आहे. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेक घरांचं नुकसान झालं आहे.

विक्रोळी सुर्यनगर याठिकाणी आज पहाटे 3 वाजताच्या दरम्यान मुसळधार पावसाने 7 ते 8 घरं कोसळली. यात 3 जणांचा मृत्यू झाला. रामनाथ तिवारी(४५), अनिकेत रामनाथ तिवारी(23), कविता रामनाथ तिवारी(४२) अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. तर नितु तिवारी(२३) या जखमी आहेत. अजून ही 7 ते 8 जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्यांना बाहेर काढण्याचं बचाव कार्य सुरू आहे

त्याचप्रमाणे, रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील चेंबूर भागात मोठी दुर्घटना घडलीये. पावसामुळे चेंबूरच्या भारत नगर भागातील झोपडपट्टीत भिंत कोसळली आहे. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेक घरांचं नुकसान झालं आहे.

admin
Author: admin

और पढ़ें