देश
अनिल देशमुखांच्या कटोल निवास्थानी ED ची छापा; मनीलॉंडरींग प्रकरणी कागदपत्रांची चौकशी
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या घरावर पुन्हा अंमलबजावणी संचलनालयाच्या (ED) पथकाने छापे घातले आहे. देशमुख यांच्या कटोल येथील घरी ED ने पुन्हा छापे घातल्याची माहिती समोर आली आहे.
मनीलॉंडरींग प्रकरणी अनिल देशमुख यांच्या कटोल येथील निवास्थानी ED ने पुन्हा छापेमारी केली आहे. आज सकाळी ED चे चार अधिकारी नागपूरात दाखल झाले होते. त्यानंतर ते देशमुख यांच्या निवसस्थानी कटोल येथे गेले.
काही दिवसांपूर्वी देशमुख यांची 4 कोटीपेक्षा अधिकची संपत्ती ED ने जप्त केली होती. आता पुन्हा ईडीने आपली चौकशी सुरूच ठेवली आहे. विशेष म्हणजे रविवार असूनही ईडीच्या धडक कारवाया चालू असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.