देश
डोंबिवली स्टेशनजवळ इमारतीला भीषण आग
मुंबई उपनगरात भीषण आग लागली आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ इमारतीला भीषण आग लागली. लक्ष्मी निवास बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावर अचानक आग लागली. या आगीची माहिती तातडीनं अग्निशमन दलाला देण्यात आली. सध्यातरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ उठले होते. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग कशी लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.