मी घर सोडणार नाही, दबाबतंत्र करायला ही जागा पुरणार नाही – पंकजा मुंडे
भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे-पालवे (Pankaja Munde) यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी राज्यातील कानाकोपऱ्यातून मुंडे समर्थक (Munde supporters activists) दाखल झालेत. मुंडे भगिनींना केंद्रीय मंत्रिमंडळात डावलल्याचा निषेध दर्शवण्यासाठी हे समर्थक मुंबईत आले. भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे डावलले जात आहे, असा आरोप मुंडे समर्थकांनी केला आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले. मी घर सोडणार नाही, असे सांगताना दबाबतंत्र करायला ही जागा पुरणार नाही, स्पष्ट इशारा त्यांनी भाजपच्या नेत्यांना दिला आहे. मला पदाची लालसा नाही. मला संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, मी संपणार नाही, असे पंकजा मुंडे यांनी रोखठोक सांगितले.
‘मला सत्तेची लालसा नाही’
पंकजा मुंडे यांनी यावेळी एकदम भावून होत कार्यकर्त्यांना संबोधित केले. ज्यांनी समनार्थ राजीनामे दिले, त्यांचे राजीनामे नामंजूर करत असल्याचे यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी त्या म्हणाल्या, मी हरले. मला संपविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मी संपणार नाही. कारण तुम्ही आहात. मला सत्तेची लालसा नाही, कुठलीही अपेक्षा नाही. तुमच्या प्रेमाच्या ऋणात मी आहे. जनतेची कामं करण्यासाठी मी राजकारणात आले आहे. कुठलंही पद मिळण्यासाठी मी राजकारणात आलेली नाही. मला दबाबतंत्र कायरचे असते तर या दबाबतंत्र करायला ही जागा पुरणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे यांनी यावेळी केला.
यावेळी आम्ही नाराज आहेत, असे म्हणत कार्यकर्ते घोषणा देत होते. माझ्या डोळ्यातील पाणी बघून तुम्ही असे वागला असाल, हे मी समजू शकते. त्यामुळे राजीनामे नामंजूर आहेत. दबावतंत्र करायला ही जागा पुरणार नाही, आम्ही कोणाच्या पुढे काही मागायला गेलो नाहीत. आपल्याला जर चांगले दिसलं नाही तर डोळे चोळून बघतो. त्यामुळे आता थोडे डोळे चोळून बघूया. पक्षाने जे दिले ते मी लक्षात ठेवले. पण मला काय दिले नाही तेही लक्ष ठेवा. केंदीय मंत्री नसले तरी मी राष्ट्रीय मंत्री आहे, असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
माझ्या बापाचे स्वप्न काय होतं, भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, हे होते. त्यांनी महाराष्ट्रात यात्रा करत तो पिंजून काढला. गोपिनाथ मुंडे यांनी समाजाच्या ऋणात राहून तळागळात काम केले. तळागाळातील कार्यकर्त्याला स्थान मिळाले पाहिजे, यासाठी त्यांनी काम केले. तुमच्या प्रेमाच्या ऋणात मी आहे. जनतेची कामं करण्यासाठी मी राजकारणात आले आहे. कुठलंही पदी मिळण्यासाठी मी राजकारणात आलेली नाही. जनतेची कामे करण्यासाठी मी राजकारणात आहे, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
‘मोदी- शाह आणि नड्डा हे माझे नेते’
आपल्याला सत्तेची लालसा नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी- अमित शाह आणि नड्डा हे माझे नेते, असे यावेळी पंकजा यांनी स्पष्ट केले. शक्य आहे तोवर धर्मयुद्ध टाळणार असल्याचे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्यावेळी कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर करत आहेत. प्रवास खडतर आहे. मी हरले आहे पण संपले नाही. योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. जनतेच्या मुख्यमंत्री म्हणाले म्हणून जड गेले, असे सगळं म्हणतात. कोण म्हणते मला पंतप्रधान व्हायचे आहे ते चालते का. धर्मयुद्ध टाळायचा प्रयत्न करते जोवर शक्य तोवर. आपले घर आपण का सोडायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.