Search
Close this search box.

बालभारतीची पाठ्यपुस्तके लवकरच विद्यार्थ्यांना मिळणार!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

‘कोविड 19’ मुळे या वर्षी बालभारतीची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना प्राप्त झाली नव्हती. समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व स्वाध्याय पुस्तके वितरण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. पाठ्यपुस्तके व स्वाध्याय पुस्तकांची वाहतूक करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया द्वारा मुंबईतील शिरीष कार्गो सर्विस प्रा. लिमिटेड कंपनीला वाहतूकदार म्हणून नियुक्त केले आहे.

बालभारती भांडार ते शाळेपर्यंत पुस्तके वितरण करून ती पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी सुक्ष्म नियोजन करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी व कालमर्यादेत हे काम पुर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. पाऊस, वारा अथवा नैसर्गिक आपत्ती यामुळे पुस्तके खराब होणार नाहीत यासाठी दक्षता घ्यावी लागणार आहे.

राज्यातील प्राथमिक शिक्षण अधिकार्‍यांनी प्रत्येक तालुक्यातील प्रतिनिधीनी बालभारतीच्या भांडारा मध्ये मध्ये न जाता योग्य ते नियोजन करून व समन्वय साधून पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर कार्यवाही करण्यास सांगितले आहे.

शालेय स्तरावर पुस्तके प्राप्त झाल्यानंतर संबंधित शाळांनी पाठ्यपुस्तके केंद्र प्रमुखांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावीत. वितरित केलेल्या पुस्तकांच्या सर्व नोंदी ठेवणे आवश्यक आहे. पुस्तके वितरित करत असताना ‘कोविड 19’ च्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून विद्यार्थी व पालकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें