Search
Close this search box.

धक्कादायक! डिमार्टमध्ये गुळात सापडली मृत पाल, ग्राहकांच्या जीवाशी खेळ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आपण एकत्र महिन्याभराचं सामना भरायचं म्हणून सहज डिमार्टमध्ये खरेदी करायला जातो. मात्र तुम्ही डिमार्टमधून सामना खरेदी करत असाल तर सावधान! सामना घेत असताना ती वस्तू नीट तपासून पाहा. याचं कारण म्हणजे डिमार्टमध्ये खरेदी केलेल्या गुळामध्ये मृत पाल आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हा भयंकर प्रकार वसई 13 जूनला वसई पश्चिम भाबोळा येथील डिमार्टमध्ये घडला आहे. या प्रकरणी जय नामदेव असे या ग्राहकांचे नाव असून त्यांनी तातडीनं तक्रार दाखल केली आहे. तर डीमार्ट प्रशासनाचा संबंधित प्रकाराकडे कानाडोळा केल्याची बाब समोर आली आहे. या घटनेनंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे.

नेमका काय आहे प्रकऱण?
जय नामदेव यांनी 13 जून रोजी भाबोळा येथील डिमार्टमधून काही किराणा सामान विकत घेतलं. त्यात किंजल कंपनीचे पॅकबंद अर्धा किलो वजनाची गुळाची ढेप त्यांनी विकत घेतली. घरी आल्यानंतर त्यांनी सामान उघडून पाहिलं तर गुळाच्या ढेपीमध्ये मृत पाल त्यांना आढळून आली.

admin
Author: admin

और पढ़ें