Search
Close this search box.

बाळासाहेब थोरात यांनी घेतली शरद पवार यांची भेट, या भेटीमागे नक्की कारण काय…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राज्यात राजकीय भेटीगाठींचा सिलसिला सुरूच आहे. आज काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत राजकीय सद्यस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज अचानक शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट झाली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितलं जाते आगे. पण राज्यातील सद्य राजकीय परिस्थिती आणि विविध राजकीय विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

दरम्यान, ‘सिल्वर ओक’कडे आता राज्याचे लक्ष वेधले जात आहे. कारण ‘सिल्वर ओक’ हे शरद पवार यांचे मुंबईतील घर. हे घर चर्चेत येण्याचे कारणही तसेच आहे. याठिकाणी राजकीय नेत्यांच्या भेटीचा सिलसिला सुरु झाल्याचे दिसून येत आहे. आधी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांची भेट घेतली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्यात. या भेटीची जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र, ही भेट सदिच्छा भेट असल्याचे फडडणीस यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. खडसे यांनीही पवारांची सदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे मंगळवारी फडणवीस यांनी जळगावमध्ये खडसे यांच्या घरी भेट दिली होती. आज पुन्हा काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी भेटत घेतल्याने राजकारणात सुरू असलेल्या भेटींच्या चर्चांना उधाण आले आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी निवासस्थानी विविध पक्षांचे नेते येत आहेत. आज बाळासाहेब थोरात देखील पवारांची भेट घेतली.

admin
Author: admin

और पढ़ें