‘लस घ्या आणि आमच्या इथे आराम करा’ म्हणणाऱ्या हॉटेलवर महापौरांकडून धाड
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा राज्याला वेढीस धरलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. असं असताना आता राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाकडे लक्ष दिलं जात आहे. लसीकरणाचा मधल्या काळात तुटवडा निर्माण झाला होता. मात्र आता लसीकरणाबाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहे.
‘लस घ्या आणि आमच्याकडेच आराम करा’ अशा पद्धतीची ऑफर अंधेरीतील ललितने हॉटेलने दिली आहे. या अंधेरीच्या ललित हॉटेलमध्ये मुंबई महापौर किशोरी पेडणेकरांनी धाड टाकली आहे. हॉटेलकडून लस घ्या आणि हॉटेलमध्ये आराम करा आशा आशयाच पॅकेज दिलं जात आहे. 3500 ते 4000 रुपये आशा प्रकारचं हे पॅकेज या ललित हॉटेलने दिले. हे पॅकेज आक्षेपार्ह आहे असं महापौर यांनी सांगण्यात आले आहे.
सोशल मिडियावर हे पसरलंय यामुळे याला विरोध केला जात होता. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा जाणवत असताना एका हॉटेल अशा प्रकारची ऑफर देणं अतिशय चुकीचं आहे. सोशल मीडियावर या पॅकेजवर आणि सरकारवर टीका करण्यात आली.