Search
Close this search box.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने या देशात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मलेशिया (Malaysia) मध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. दररोज 8 हजाराहून अधिक रुग्णांची वाढ होत असल्याने सरकार सतर्क झालं आहे. त्यामुळे सरकारने देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. 1 ते 14 जून दरम्यान लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात सर्व सामाजिक आणि आर्थिक क्षेत्राच्या संचालनास परवानगी दिली जाणार नाही. केवळ आवश्यक आर्थिक सेवांना सूट दिली जाईल. शनिवारी सकाळपर्यंत कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यूची संख्या वाढून 35.25 लाखांवर गेली आहे. (Lockdown In Malaysia)

सिन्हुआ न्यूज एजन्सीने शुक्रवारी पंतप्रधान कार्यालयाचा हवाला देत ही माहिती दिली. सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अचानक नवीन रुग्णांची वाढ होऊ लागल्याने आणि देशात रुग्णालयांची संख्याही मर्यादित आहे. त्यामुळे देशातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा ढासळण्याआधीच सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आरोग्य मंत्रालय देशभरातील रुग्णालयांची क्षमता वाढविण्यासाठी काम करत आहे. देशात लसीकरणाचं प्रमाण ही सुधारले जाईल, असेही सरकारने म्हटले आहे.

येत्या 15 दिवसांत परिस्थिती सुधारल्यास आणि प्रकरणे कमी झाल्यास काही आर्थिक क्रियांना परवानगी दिली जाईल. अलिकडच्या काही आठवड्यांमध्ये कोरोना संसर्गामध्ये वाढ झाली आहे. शुक्रवारी 8,920 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तर 61 मृत्यूंची नोंद झाली. यानंतर, देशात कोरोना संक्रमितांची संख्या वाढून 549,514 झाली आणि मृतांचा आकडा 2,552 वर पोहोचला आहे.

सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 72,823 आहे. त्यापैकी 808 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले आहे.

admin
Author: admin

और पढ़ें