राष्ट्रवादीच्या नेत्याच्या अंत्ययात्रेत हजारोंची गर्दी; कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांची पायमल्ली
राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांचे काल रात्री हृदय विकाराच्या झटक्याने जळगावात निधन झाले. मलिक यांच्या अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येत कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
अंत्ययात्रेत प्रसंगी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा तैनात होता. मात्र पोलिसांसमोरच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करण्यात आली. प्रशासनाला गर्दीला आवर घालण्यास सपशेल अपयश आल्याचे दिसून आले.
अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. यावेळी कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात आली. असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी विनामास्क फिरत असल्याचे दिसून आले.
अंत्ययात्रेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासह अनेक नगरसेवकांची व पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
मात्र एकीकडे जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने कठोर कार्यवाही केली जात आहे. लग्नकार्य, सामाजिक कार्यक्रम, बाजारपेठांमध्ये सर्वसामान्यांवर प्रशासन कारवाईचा बडगा उगारत आहे. मात्र राजकीय नेत्याच्या अंत्ययात्रेप्रसंगी कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली होत असताना पोलीस देखील हतबल झाल्याचे पाहायला मिळाले.