देश

YouTubeDown | जगभरात यु ट्यूबची सर्व्हिस डाऊन; ऍप आणि डेक्स्टॉपवर वापरकर्त्यांना अडचणी

आज जागतिक पातळीवर YouTube डाऊन असल्याचे दिसून आले. जगभरातील युजर्सचे व्हिडिओ प्ले होत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. युट्यूबचे ऍप आणि डेक्स्टॉप दोन्ही प्लॅटफॉर्मवर या तक्रारी आल्या आहेत. YouTube ने देखील युजर्सला या अडचणी येत असल्याचे मान्य केले आहे.

‘आम्ही मागील एका तासापासून YouTube युजर्सला येणाऱ्या तक्रारींची नोंद केली आहे. आम्ही ही अडचण लक्षात घेत आता तो दुरूस्त केला आहे. यापुढे युजर्स कोणत्याही अडचणीशिवाय YouTube च्या व्हिडिओचा वापर करू शकतील. युजर्सने ही अडचण लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद…’ असे YouTube कडून सांगण्यात आले आहे.

ट्विटरवर ट्रेंड #YouTubeDown
व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर का अडचणी येत आहेत. याबाबत युजर्स ट्विटरवर येऊन शेअर करू लागले. त्यासोबतच #YouTubeDown हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.

Related Articles

Back to top button