देश

RBI ने बँकांचे नियम बदले ! हटवली 9 वर्षांची बंदी, लाखो ग्राहकांना होणार फायदा

RBI New Rule:देशातील खासगी बँका देखील आता सरकारी व्यवसायात भाग घेऊ शकतील. भारतीय रिझर्व बँकेने (RBI)अभ्यासानंतर निर्देश जारी केले. आता खासगी बँकांना सरकारी व्यवसायात जास्त पैसे कमविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

आता सरकारी काम देखील करणार खासगी बँक
सरकारचे बॅंकिंगचे कामकाज आतापर्यंत केवळ सरकारी बँकांच्या माध्यमातून केले जात होते. यात खासगी बँकांचा सहभाग असायचा नाही. त्यानंतर फेब्रुवारी 2021मध्ये वित्त मंत्रालयाच्या खासगी क्षेत्रातील बँकांना सरकारी व्यवसाय करता यावा म्हणून सप्टेंबर 2012 मध्ये घालण्यत आलेली बंदी हटवण्याची घोषणा केली होती. वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते की, खासगी बँकांना आता सरकारच्या बँकिंग कामकाजामध्ये सहभागी होता येणार आहे. याचा फायदा खासगी बँकांवर असलेली बंदी उठविण्यात आली असून ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळणार आहे. याचा लाखो ग्राहकांना होणार आहे.

RBIचे नवीन नियम काय आहेत
RBIने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार अनुसूचित खासगी बँका आरबीआयबरोबर करारानंतर सरकारी व्यवसायात भाग घेऊ शकतात, परंतु ज्या बँका आरबीआयच्या पीसीएमध्ये (प्रॉम्प्ट करेक्टिव अ‍ॅक्शन) असतील त्यांना तसे करण्यास परवानगी दिली जाणार नाही. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आता खासगी बँका देखील भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये, सरकारच्या सामाजिक क्षेत्रातील कामांमध्ये आणि ग्राहकांची सुविधा वाढविण्यासाठी समान भागीदार बनू शकतील.

आता ग्राहकांवर काय परिणाम होईल
कर आणि इतर महसूल भरणा सुविधांसारख्या सरकारशी संबंधित बँकिंग व्यवहारात खासगी बँका देखील सामील होऊ शकतात. या नव्या धोरणामुळे ग्राहकांना सुविधा मिळेल आणि स्पर्धा वाढेल तसेच ग्राहकांच्या सेवेचा स्तरही वाढेल. आता आरबीआयवर खासगी बँकांना सरकारी बँकिंगची कामे देण्यास कोणतेही बंधन असणार नाही.

उद्योगाने स्वागत केले
सरकारच्या या हालचालीला उद्योगातील दिग्गजांनी चांगले पाऊल म्हटले आहे. कोटक महिंद्रा बँकेचे एमडी उदय कोटक म्हणाले की, या पुरोगामी सुधारणांचे मी स्वागत करतो. याद्वारे बँकिंग क्षेत्र ग्राहकांना अधिक चांगली सेवा देऊ शकेल. देशाच्या शाश्वत विकासासाठी खासगी आणि सरकारी दोन्ही क्षेत्रांनी एकत्र काम केले पाहिजे.

Related Articles

Back to top button