देशभरात लोकांना कोरोना लस (Vaccination) घेण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. पण लसीचा अभाव आणि पोर्टलवरील नोंदणीशी संबंधित समस्यांमुळे लोक गोंधळले होते. दरम्यान यंत्रणा सुधारण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज आहे. याच अनुशंगाने कोविन पोर्टलमध्ये (CoWIN Portal) महत्त्वपूर्ण बदल केले गेले आहेत. या बदलांद्वारे काही तक्रारी (Complaints) दूर केल्या गेल्या आहेत. तसेच अशा काही सुविधा जोडल्या गेल्या आहेत. यामुळे नोंदणी सुलभ होणार आहे.
1 मेपासून सरकारने 18 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू केले आहे. त्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी केली जात आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने लोकांनी नाव नोंदणी केली होती. तेव्हापासून यासंदर्भात लोकांच्या अनेक प्रकारच्या तक्रारी येऊ लागल्या. लोकांनी सोशल मीडियावर उघडपणे या समस्यांचा उल्लेख केला. हे लक्षात घेऊन सरकारने आता कोविन पोर्टलमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.









