कोविड नियम पायदळी, 60हून अधिक दुकानांना सील
कोरोनाचा उद्रेक राज्यात पाहायला मिळत आहेत. (Coronavirus in Maharashtra) अनेक जिल्ह्यातही कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोना साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला. कोविडचे नियम कडक करण्यात आले. मात्र, हे नियम पायदळी देण्यात येत असल्याने जिल्हा प्रशासनाने आता कडक पावलं उचलण्यात सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून कोरोना काळात दुकाने उघडी ठेवणाऱ्यांना जोरदार दणका दिला आहे. 60 हून अधिक व्यापाऱ्यांची दुकाने सील करण्यात आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आता धास्ती घेतली आहे. (More than 60 commercial shops sealed in Wardha)
तीन दिवसांकरिता दुकानांना सील
वर्ध्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला असतांना नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत होते. फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे तर शहरातील व्यापारी वर्गाकडून कोविड नियमांची पायमल्ली दिसून आली. त्यांनी आपली दुकाने सुरु ठेवून व्यापार करीत असल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. आता शहराच्या मुख्य बाजार परिसरातील दुकाने सील करीत कारवाई करण्यात आली आहे. आजच्या कारवाईत नगरपालिका आणि महसूल विभागाने 60 हून अधिक दुकाने सील केली आहेत.
नगरपालिका, महसूल विभागाकडून कारवाई
वर्ध्यात जीवनावश्यक वस्तूची दुकाने उघडी ठेवण्यात आले होती. मात्र या दुकांनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने जिल्हा प्रशासनाने आता नवी शक्कल लढवीत तीन दिवसांसाठी व्यापाराचे दुकाने सील केली आहेत. शहरातून काही व्यापारी आपला व्यापार दुकानांच्या मागच्या शर्टरमधून व्यापार सुरु ठेवला होता. त्यांच्यावर देखील प्रशासनाकडून कारवाई केली जात आहेत. बाजारपेठेत अनेक दुकांनपुढे सॅनिट्रायझर ठेवलेले नाही. सोशल डिस्टन्सिंगचे नियमानुसार दुकानापुढे गोल आखलेले नसल्यामुळे दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती वर्ध्याचे तहसीलदार रमेश कोलपे यांनी दिली.