बनावट कोविड रिपोर्ट बनविणारे रॅकेट उघड, डॉक्टरसह 5 जणांना अटक
कोरोनाचा ( Coronavirus) फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ( Coronavirus in India) त्यामुळे कोरोना टेस्ट करण्यावर भर देण्यात आला आहे. मात्र, काही ठिकाणी बनावट रिपोर्ट देण्यात येत असल्याने कोरोनाविरुद्धच्या मोहिमेला गालबोट लागत आहे. बनावट कोविड रिपोर्ट (Fake Covid Report) तयार करणाऱ्या लोकांवर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) शुक्रवारी कारवाई केली. मालवीय नगर परिसरातील डॉक्टरांसह पाच जणांना अटक केली.
बनावट कोविड रिपोर्टचे रॅकेट उघडकीस
डीसीपी अतुल भाटिया यांनी सांगितले की, गुरुवारी पोलिसांना पीसीआर कॉल आला. त्यानंतर अधिक चौकशी केली असता, मालवीय नगरमधील जेनस्ट्रेक्स लॅबमध्ये बनावट कोविड अहवाल तयार केला जात होता. बनावट रिपोर्ट देणाऱ्यांना ताब्यात घेतले. दक्षिण दिल्लीचे डीसीपी अतुल भाटिया माहिती देताना सांगितले की, पोलिसांनी याप्रकरणी प्रज्ञानंद तथा निहाल, हिमांशू शर्मा, डॉ. मनीषकुमार सिंग, सतेंद्र आणि निखिल यांना अटक केली आहे.
अशी झाली पोलखोल
दिल्लीचे डीसीपी अतुल भाटिया यांनी पुढे सांगितले की, कॉल करणारे विपुल सैनी यांच्या म्हणण्यानुसार, एप्रिलमध्ये त्याने आपल्या नातेवाईकांचे नमुने हिमांशु आणि प्रज्ञानंद शर्मा यांना कोल्ड डिव्हायडिंगसाठी दिले होते. त्यांनी असा दावा केला की, २5 एप्रिलला त्याच्या ओळखीचा असलेला ऋषभ शुक्ला यांनीही त्यांना त्याचा नमुना दिला आणि 26 एप्रिल रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला, पण त्याला कोरोनाचे काही लक्षण नव्हते.
रेकॉर्ड बुकमध्ये सॅम्पल देणाऱ्याचे नाव नाही
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की 28 एप्रिलला ऋषभ शुक्ला यांनी पुन्हा स्पाइस हेल्थ प्रयोगशाळेत आपला नमुना दिला, जेथे त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. 29 एप्रिलला विपुल सैनी, हिमांशू शर्मा आणि प्रज्ञानंद यांनी जेनेस्ट्रेस लॅबमध्ये जाऊन तपासणी केली असता ऋषभ शुक्ला यांचा कोविड अहवाल या लॅबच्या रेकॉर्डमध्ये नसल्याचे आढळले.
त्यानंतर हिमांशूने सांगितले की, तो आपला चुलतभाऊ प्रज्ञानंद यांच्यासह घरातून नमुने गोळा करीत असे आणि जेनिस्ट्रिक लॅबच्या नोंदीत त्यांचा समावेश न करता तेथे काम करणारे डॉक्टर मनीषकुमार सिंह यांना देत असे. डीसीपी अतुल भाटिया म्हणाले की, जेन्स्ट्रेस लॅबच्या बनावट कागदपत्रांवर रिपोर्ट छापण्यात आले होते, जे त्यांना डॉक्टर देत असे.