Search
Close this search box.

एका महिला न्यूज अँकरचा कोरोनाने मृत्यू

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोरोना दिवसागणिक आणखी भयंकर होत आहे. शुक्रवारी प्रसिद्ध वृत्तनिवेदक आणि जेष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांचं निधन झालं. त्यामुळे मीडियाविश्वाला मोठा धक्का बसला. त्यांच्या पाठोपाठ आता दुरदर्शनच्या महिला वृत्तनिवेदका आणि अभिनेत्री कनुप्रिया यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ब्रह्माकुमारी शिवानीने त्यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.

शिवानी ट्विट करत म्हणाल्या, ‘ओम शांती. रात्री सर्वांच्या आवडती बहिण कनुप्रियाने या जगाचा निरोप घेतला. कनुप्रिया आता दुसऱ्या जादूच्या जगात गेल्या आहेत. आपण सर्व मिळून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करू…’ शिवानी यांचं हे ट्विट सध्या व्हायरल होत आहे.

कनुप्रियाने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करत रूग्णालयात दाखल झाल्याची माहिती दिली.’ आता मिळालेल्या माहितीनुसार ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें