देश

राज्यात करोना लस मोफत देणार?; १ मे रोजी राज्य सरकार करणार मोठी घोषणा

करोना प्रतिबंधक लशीसंदर्भात राज्य सरकार येत्या १ मे रोजी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे. राज्यातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करण्याची शक्यता आहे. तसे स्पष्ट संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. महाराष्ट्रात सुरू असलेले लसीकरण, ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय सामग्रीच्या पुरवठ्याविषयी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. या बरोबरच कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढले जाईल, असेही पवार म्हणाले. (Ajit Pawar hinted that free corona vaccine will be announced in the state on May 1)

देशातील विविध राज्यांसह महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. आपल्या राज्याला ऑक्सिजनची अधिक गरज होती आणि ती भरून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह आम्ही सर्वांनी प्रयत्न केले, असे पवार म्हणाले. ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी देखील चर्चा केली. त्यानंतर ऑक्सिजन टँकर विमानातून नेण्याची परवानगी देण्यात आल्याचे ते म्हणाले. रिकामे टँकर विमानातून नेण्यास परवानगी देण्यात आली असून भरलेले टँकर रेल्वे आणि रस्तेमार्गे आणण्यात येतील, अशी महत्वाची माहितीही त्यांनी दिली आहे.

‘लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणार’

करोना बाधित रुग्णांच्या संख्येचा विचार करता बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. मोठ्या प्रमाणावर रुग्ण रुग्णालयांमध्ये येत आहेत. आम्ही काही निर्णय लाँग टर्मसाठीही घेत आहोत. केंद्र सरकारने १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्यांवर जबाबदारी दिली आहे. त्यासाठी आम्ही ५ सदस्यीय समिती बनवत आहोत. ग्लोबल टेंडर काढण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button