देश

Sexual Harassment Case : विजय राज यांना बॉम्बे हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा

बॉलिवूड अभिनेता विजय राज यांना विनयभंग प्रकरणात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम दिलासा दिला आहे. अभिनेता विजय राज यांच्यावर 2020 साली ‘शेरनी’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान हॉटेल रूममध्ये एका असिस्टेंड दिग्दर्शक महिलेची छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी गोदिंया जिल्ह्यातून विजय राज यांना अटक केलं. काही वेळाने त्यांना जामीन देखील मिळाली.

एक आठवड्यापूर्वी विजय राज यांच्यावर छेडछाड प्रकरणात केलेल्या तक्रारारीनुसार मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामार्फत याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात सुनावणी झाल्यानंतर सुरू असलेल्या खटल्याच्या कारवाईवर स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणी विजय राज यांच्यावर गोंदिया येथे कोणतीही ट्रायल चालणार नाही.

या प्रकरणाबाबत विजय राज यांच्या वकील सवीना बेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुर कोर्टाच्या आदेशानंतर विजय यांच्यावर गोंदियात ट्रायल होणार नाही तसेच गोंदियाचे पोलीस त्यांना या प्रकरणाच्या चौकशीकरता बोलवू देखील शकत नाहीत.

गोंदियातील रामनगर पोलीस ठाण्यात 3 नोव्हेंबर 2020 रोजी विजय राजविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर विजय राज यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही ‘शेरनी’ चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाची शूटिंग मध्य प्रदेशात सुरु होती, त्यावेळी विजय राजवर चित्रपटाशी संलग्न एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला होता. या प्रकरणात विजय राज यांचे नाव जोडताच त्यांना या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तसेच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी समिती नेमली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.

Related Articles

Back to top button