Search
Close this search box.

कोरोना वृद्धाश्रमातही घुसला! 14 निराधार गंभीर आजारी अनेकांची प्रकृती अस्वस्थ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोरोना विषाणूने राज्यात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोणत्याच वयोगटातील लोकांना विषाणूने सोडलं नाही. राज्याची आरोग्य यंत्रणा पार कोलमडलीये. पनवेलपासून जवळच असलेल्या तळोजा येथील वृद्धाश्रमात कोरोनाने कहर माजवला आहे.

तळोजा येथील वृद्धाश्रमात 56 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आबानंद वृद्धाश्रम येथे अनेकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. वृद्धाश्रमात 61 निराधार वृद्धापैकी 56 वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

चिंताजनक बाब म्हणजे 14 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धक्कादायकबाब समोर, पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक मृत्युदर

कोरोनाचा (Coronavirus ) सध्या उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित हे राज्यात आहेत. (Coronavirus in Maharashtra) कोरोनाची परिस्थिती चिंता करणारी आहे. त्यामुळे राज्यात 144 कलम लागू करत कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या संचारबंदीचे नियमही अनेकांकडून पाळले जात असल्याने लॉकडाऊनचा विचार पुढे येत आहेत. दरम्यान, राज्यात पश्चिम महाराष्ट्रात भयावह परिस्थिती दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक मृत्यूदर दिसून येत आहे.

admin
Author: admin

और पढ़ें