RCB vs SRH IPL 2021 Match Preview : चेन्नईमध्ये हैदराबाद आणि बंगळूरू एकमेकांशी भिडणार
आज आयपीएलमध्ये हैदराबाद आणि बंगळूरु हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. संध्याकाळी 7.30 वाजता चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. आरसीबीने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरूद्धच्या विजयासह मोहीम सुरू केली. त्याचवेळी हैदराबादला पहिल्या सामन्यात कोलकाताच्या हातून पराभवाला सामोरे जावे लागले.
बंगळूरुच्या या सामन्यात पुन्हा एकदा सर्वांची नजर मागील सामन्यातील हिरो हर्षल पटेलकडे असणार आहे. त्याने पाच बळी घेतले.या सामन्यात हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरकडून जबरदस्त कामगिरीची अपेक्षा असेल. आकडेवारीबद्दल बोलताना सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये खेळलेल्या सामन्यांमध्ये 10 आणि आरसीबी 7 सामने जिंकले आहेत.
चेन्नईची ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. ज्यामध्ये रशीद खान आणि मोहम्मद नबी हा सामना हैदराबादच्या बाजूने वळवू शकतात. हैदराबादच्या तुलनेत आरसीबीचा स्पिन विभाग या सामन्यात कमकुवत दिसत आहे.
हैदराबादकडून वॉर्नरने बंगळूरुविरूद्ध सर्वाधिक 593 धावा केल्या आहेत. बंगळूरुकडून हाच विक्रम संघाच्या कर्णधार कोहलीच्या नावावर आहे ज्याने हैदराबादविरुद्ध सर्वाधिक 531 धावा केल्या आहेत. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर भुवनेश्वरकुमार हा बंगळूरु विरुद्ध हैदराबादचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने कोहलीच्या संघाविरुद्ध 14 बळी घेतले आहेत. त्याचवेळी, हैदराबादच्या जास्तीत जास्त 16 फलंदाजांना पॅव्हेलियनचा मार्ग दाखविणारा लेगस्पिनर युजवेंद्र चहलकडून पुन्हा एकदा बंगळूरु संघाला बरीच आशा आहे.