Search
Close this search box.

भाजप कार्यालयात रेमडेसिवीरचे मोफत वाटप; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

देशामध्ये रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा असताना सुरतमधील भाजपाच्या कार्यालयात हेच औषध मोफत वाटले जात आहे हे राजकारण नाही तर काय आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

करोना प्रतिबंधासाठी वैद्यकीय उपचारांमध्ये वापरात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्यानं कुटुंबीयांची धावाधाव सुरु आहे. अश्यावेळी दुकानदार अव्वाच्या सव्वा किमतीने इंजेक्शन विकत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन खरंच उपयोगाचं असतं का? तज्ज्ञ म्हणतात…

नवाब मलिक यांनी ट्वीट करुन भाजपाच्या गुजरातमधील रेमडेसिवीर मोफत वाटपाच्या राजकारणावर सवाल उपस्थित केला आहे. करोनाने देशात आणि राज्यात गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यातच केंद्रसरकारकडून राज्यात लस वाटपात राजकारण सुरू असतानाच गुजरातमधील सुरत येथील भाजप कार्यालयात मोफत रेमडेसिवीर वाटप करण्यात येत आहे, असं ट्वीट नवाब मलिक यांनी केलं आहे.

रेमडेसिवीरसाठी जिल्हास्तरावर कंट्रोल रूम

राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी राज्यात करोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. अशावेळी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यानुसार आता जिल्हास्तरावरच कंट्रोल रूमची उभारणी केली जाणार आहे. जिल्हा पातळीवर समिती जिल्हा स्तरावर एक तांत्रिक समिती गठीत करून त्यामार्फत विशिष्ट पद्धतीने खासगी रुग्णालयात रेमडेसिवीरचा उपयोग व्यवस्थित होत आहे की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. रेमडेसिवीरची गरज भासल्यास राज्यस्तरावरील एफडीएमच्या कंट्रोल रूमशी संपर्क करून कारवाई केली जाणार आहे. जिल्हास्तरावर यासाठी कंट्रोल रूम स्थापन केली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें