देश

Corona : वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या पार्श्वभूमीवर मुंबईपाठोपाठ ठाण्यातही मोठा निर्णय

मुंबईप्रमाणेच आता ठाण्यातही मॉलमध्ये प्रवेशापूर्वी कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. कोरोनाची अँटीजेन टेस्ट केल्यावर निगेटीव्ह अहवाल आला, तरच ठाण्यातील मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे. ठाणे महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी ही माहिती दिली आहे.

मुंबईप्रमाणेच ठाण्यातील कोरोना रुग्णसंख्याही वेगाने वाढू लागली आहे. शिवाय मुंबईलगतचेच शहर असल्याने मुंबईतील लोकही ठाण्यात येऊन संसर्ग वाढण्याचा धोका आहे. मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यात सण असल्याने अनेक ऑफर्स असल्याने गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

उद्यापासूनच या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. ठाण्यातील प्रत्येक मॉलमध्ये अँटीजेन टेस्ट केल्यानंतर कोरोना अहवाल निगेटीव्ह आला, तरच प्रवेश दिला जाणार आहे.

याआधी मुंबईतही अशाप्रकारचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन प्रत्येक मॉलमध्ये प्रवेशासाठी कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button