देश

सिग्नलच्या कटकटीतून मुंबईकरांची सुटका, सांताक्रुझ-चेंबुर लिंक रोडचा तिसरा टप्पा खुला होणार

सांताक्रुझ- चेंबूर लिंक रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीएने विविध उड्डाणपुलांची उभारणी केली आहे. त्यातील दोन उड्डाणपुलांचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. आता या प्रकल्पातील तिसरा उड्डाणपुल फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

सातांक्रुझ -चेबुर रस्त्यावरील वाहतूककोंडी दूर होण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. या उड्डाणपुलामुळं कपाडिया नगर जंक्शनपासून पश्चिम द्रुतगती एक्स्प्रेसवरुन कुर्लाला लवकर पोहोचणे शक्य होणार आहे. तसं, सिग्नलची कटकटही मिटणार आहे. या उड्डाणपुलाची लांबी ३.८ किलोमीटर असून एकूण ४१५ कोटींचा खर्च आला आहे.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ते लाल बहादूर शास्त्री मार्ग जंक्शन आणि हंस भुग्रा जंक्शन ते अहमद रझा चौक या फ्लायओव्हरचा काही भाग फेब्रवारी महिन्याच्या अखेरीस खुला केला जाईल, अशी शक्यता आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा कुर्ला बस डेपो ते वाकोला- BKC लवकरच सुरु केला जाईल. तर, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाकोला उड्डाणपुलाशी जोडला जाणारा दुसरा टप्पा काहीवेळाने लवकरच पूर्ण होईल.

हा प्रकल्प ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील चेंबूरला वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला वाकोल्यासोबत जोडतो. एमएमआरडीएच्या अहवालानुसार, यामुळे प्रवासाचा वेळ १५ ते २० मिनिटांनी कमी होईल.

असा असेल मार्ग

सीएसटी रोड, कलिना, हंसभुग्रा मार्ग, वेस्टर्न एक्स्प्रेस मार्ग, वाकोला जक्शंन, या मार्गांना जोडतो.

Related Articles

Back to top button