महिन्याभरापासूनचा तणाव आणि त्यानंतर मागील 5 दिवसांपासून सुरू असणारं युद्ध या संपूर्ण परिस्थितीला आता अतिशय गंभीर वळण मिळालं असून, फक्त आखाती देशच नव्हे तर त्यामध्ये इनेक देशांती निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याचंही वृत्त हादरवून जात आहे. इस्रायलनं इराणच्या अनेक शहरांवर निशाणआ साधर क्षेपणास्त्रांचा मारा सुरूच ठेवला आहे. तर या हल्ल्याला इराणही तोडीस तोड असं उत्तर देत अमेरिकेला घाम फोडताना दिसत आहे. इराणनं हल्ल्याचा सूड उगवत त्या सर्व ठिकाणी हल्ला करण्यास सुरुवात केली आहे जिथंजिथं अमेरिकी लष्करी तळ आहेत. याचदरम्यान एक हाहाकार माजवणारं वृत्त समोर आलं असून त्यानुसार श्रीलंकेच्या किनाऱ्यानजीक एका इराणी जहाजावर पाणबुडीच्या मदतीनं भयंकर हल्ला करण्यात आला आहे. ज्यामध्ये 100 हून अधिक नागरिक बेपत्ता असून, जखमींचा आकडा 78 पेक्षा जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे.
हल्ला झाल्यानंतर एकच हाहाकार, नंतर काय घडलं?
श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या माहितीनुसार पाणबुडीच्या हल्ल्यानंतर इराणी जहाजावर असणाऱ्या 32 नागरिकांना सुखरुप वाचवण्यात यंत्रणांना यश मिळालं असून, त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार रुग्णालयात दाखल असलेल्यांपैकी एकाची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.
परराष्ट्र मंत्र्यांनी श्रीलंकेतील संसदेला दिलेल्या माहितीनुसार देशातील नौदलाला 180 नागरिक असणाऱ्या एका जहाजावर आयआरआयआयएस डेनामध्ये IRIS Dena (hull number 75) संकट ओढावलं असून, ही माहिती मिळताच तातडीनं बचावकार्यासाठी घटनास्थळी जहाजं आणि वायुदलाची विमानं पाठवण्यात आली. या जहाजावर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर बेपत्ता नागरिकांचा आकडा मोठा असून, आता त्यासंदर्भातील नवी माहिती केव्हा समोर येते याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.








