Search
Close this search box.

पाकिस्तानात अफगाणिस्तानचा एअरस्ट्राइक! PM कार्यालयाजवळ ड्रोन हल्ला; इस्लामाबादकडून कंधारचा बदला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सध्या युद्ध पेटलं आहे. यादरम्यान अफगाणिस्तानने आपली हवाई ताकद दाखवली असून, इस्मालाबादमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाजवल हल्ला केला आहे. पंतप्रधान कार्यालयापासून 5 किमी अंतरावर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या पॉवर कॉरिडोअरमध्ये खळबळ उडाली आहे. अफगाणिस्तान सीमा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता इस्लामाबादवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यासह अफगाणिस्तानने पाकिस्तानला आपली क्षमता दाखवली आहे.

अफगाणिस्ताने गृह मंत्रालयाच्या बॉर्डर पोलिसांचे प्रवक्ते अब्दुल्ला फारुकी यांनी ‘आज तक’शी संवाद साधताना मोठा दावा केला आहे. अफगाणिस्तान पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयापासून 5 किमी अंतरावर हल्ला करण्यात यशस्वी झाला आहे.

अब्दुल्ला फारुकी यांनी सांगितलं आहे की, “आम्ही एक तास आधी इस्लामाबादमध्ये एअर स्ट्राइक केला आहे. इस्लामाबाद, नौशेरा, एबटाबाद, जमरुद येथे आम्ही हल्ला केला आहे. इस्लामाबादमधील पंतप्रधान कार्यालयापासून 5 किमी अंतरावर लष्कराची छावणी आहे, तिथे आम्ही हल्ला केला आहे”.

अफगाणिस्तान हवाई दलाचं म्हणणं आहे की, हा हल्ला पाकिस्तानच्या महत्वाची सैन्य ठिकाणं, केंद्र आणि सुविधांवर करण्यात आला आहे. ही कारवाई पाकिस्तानकडून काबूल, कंधार आणि पक्तिया येथे रात्री करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकला उत्तर म्हणून करण्यात आली आहे. पाकिस्तानने अद्याप या दाव्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला झाल्याचं मान्य

यादरम्यान पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी अफगाणिस्तानने हल्ले केल्याचं मान्य केलं आहे. पण ते यशस्वी झाले नसल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, सुरक्षा दलांनी खैबूर पख्तूनख्वा येथील काही ठिकाणांवर फितना अल-खवारिजच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अनेक छोट्या ड्रोन हल्ल्यांना य़शस्वीपणे रोखण्यात आलं.

तरार यांनी म्हटलं की, दहशतवाद्यांनी एबटाबाद, स्वाबी आणि नौशेरा येथे छोट्या ड्रोननी हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या एंटी ड्रोन सिस्टमने सर्व ड्रोनना यशस्वीपणे इंटरसेप्ट केलं आणि कोणतंही नुकसान करण्याआधी त्यांना खाली पाडलं.

‘हे आता खुलं युद्ध’

पाकिस्तानने 26 फेब्रुवारीच्या रात्री अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह अनेक शहरांवर हल्ला केला. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी आमच्या देशाचा संयम संपला असून, आता शेजारी देश अफगाणिस्तानसह जाहीर युद्ध सुरु झाल्याचं मानत आहे असं म्हटलं.

F16 लढाऊ विमान पाडल्याचा दावा

अफगाणिस्तानमधील मीडिया टोल न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानमधील सैन्याने हवाई सीमेचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानच्या F-16 या लढाऊ विमानाला पाडलं आहे. सोशल मीडियावर विमानाचे जळतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. फोटोत जमिनीवर विमानाचा मलबा पडलेला दिसत आहे.

एका व्हिडीओत पाकिस्तानी लष्कराच्या एका जवानाला पकडल्याचा दावाही केला जात आहे. शुक्रवारी 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्ताननने काबुलशिवाय कंधार आणि पक्तिका येथे हवाई हल्ले केले. पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, या हल्ल्यांमध्ये अफगाणिस्तान लष्कराची 2 ब्रिगेड मुख्यालयं उद्धव्स्त करण्यात आली आहेत. काबूलमध्ये जवळपास 3 स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला. दरम्यान यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

admin
Author: admin

और पढ़ें