Search
Close this search box.

धावत्या कारमध्ये 28 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार! तब्बल अडीच तास अत्याचार केल्यानंतर रस्त्यावर उतरवून…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

एका  28 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेवर धावत्या कारमध्ये दोन तासांहून अधिक काळ सामूहिक बलात्कार करण्यात आला. बलात्कारानंतर तिला रस्त्यावर फेकून देण्यात आले. फरीदाबादमध्ये ही घटना घडली आहे. सोमवार आणि मंगळवारच्या मध्यरात्री हे सर्व घडलं, जेव्हा विवाहित महिला रात्री घरी जाण्यासाठी गाडीची वाट पाहत होती. एक गाडी थांबली आणि दोन तरुणांनी तिला घरी सोडण्याचं आश्वासन देऊन गाडीत बसवले. मात्र, त्यांनी घरी सोडण्याऐवजी गाडी गुरुग्राम रोडच्या दिशेने गेली.

मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास पीडितेला एसजीएम नगर येथील राजा चौकजवळ धावत्या कारमधून फेकून देण्यात आलं. महिलेच्या चेहऱ्याला अनेक गंभीर जखमा झाल्या असून, प्रचंड रक्त वाहून गेलं आहे.

पीडितेने आपल्या बहिणीला वारंवार फोन केला होता. बहिणीने परत फोन केला असता महिलेने तिला सगळा घटनाक्रम सांगितला. यानंतर तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरु केली. डॉक्टरांनी तिच्या चेहऱ्यावर 10 ते 12 टाके घातले आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. मात्र प्रकृती स्थिर असली तरी महिला अद्याप मानसिक धक्क्यात आहे. तिचा जबाब अजून नोंदवण्यात आलेला नाही.

पीडितेच्या बहिणीने आपल्या तक्रारीत सांगितलं आहे की, घटनेच्या एक दिवस आधी रात्री सुमारे 8.30 वाजता महिलेने तिला फोन करून सांगितलं होतं की, तिचे तिच्या आईशी भांडण झालं आहे आणि ती तिच्या मैत्रिणीच्या घरी जात आहे. तिने आपल्या बहिणीला असंही सांगितलं होतं की, ती तीन तासांत घरी परत येईल.

पीडित महिला विवाहित असून तिला तीन मुलं आहेत आणि कौटुंबिक वादामुळे ती पतीपासून विभक्त राहते. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांनी वापरलेली व्हॅन जप्त करण्यात आली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें